Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘मातोश्री’ जवळ कोरोनाचा संसर्ग

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असणार्‍या मातोश्री बंगल्या जवळ एकाला कोरोनाचा संसर्ग आढळून आल्याने हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतरही ते आपल्या निवासस्थानीच अर्थात मातोश्री बंगल्यावर वास्तव्यास आहेत. ते सध्या वर्षा बंगल्यावर बैठका घेत असले तरी त्यांचा निवास हा मातोश्रीवरच आहे. या पार्श्‍वभूमिवर, मातोश्री बंगल्याच्या जवळच असणार्‍या एका चहावाल्यास आज कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्याने परिसर सील करण्यात आला आहे. या माणसाच्या टपरीवर उध्दव ठाकरे यांच्या संरक्षणासाठी तैनात असणारे पोलीस चहासाठी जात असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version