Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मातंग समुदायाची सामाजिक सभागृहाची मागणी

पाचोरा, प्रतिनिधी । शहरात मातंग समुदायासाठी सामाजिक सभागृह सरकारने बांधून द्यावे अशी मागणी आमदार किशोर पाटील यांच्याकडे मानवहित लोकशाही पक्षाने केली आहे 

पाचोरा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर मातंग समाज बांधव आहेत. त्यांचे विविध धार्मिक  कार्य, लग्न सोहळे, समाजाचे मेळावे आदी कामांसाठी समाजाकडे हक्काची जागा नाही त्यामुळे पाचोरा नगरपालिका हद्दीत मातंग समाजासाठी जागा उपलब्ध करून द्यावी व त्या जागेवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे किंवा लहुजी सावळे यांचे नावे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करून मिळावे अशी आग्रही मागणी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने आमदार किशोर पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनील पाचुंदे, तालुकाध्यक्ष योगेश गायकवाड  आदींच्या  सह्या आहेत.

 

Exit mobile version