माणसांना तर सोडा, माकडांना सुद्धा रशियाची लस देणार नाही : अमेरिका

मुंबई (वृत्तसंस्था) रशियाची लस ही माणसांना तर सोडा, अमेरिकेतल्या माकडांना सुद्धा देणार नाही, अशा शब्दात अमेरिकेने रशियन लसीची खिल्ली उडवली आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतीच कोरोना विषाणूवर रशियाने लस शोधल्याचा दावा केला होता. रशियामध्ये बनविलेल्या पहिल्या कोविड -१९ लसीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. माझ्या मुलींना ही लस टोचल्याची माहिती पुतीन यांनी दिली होती. परंतू ज्या वेगाने रशियाने लस विकसीत केली. ते अतिशय गंभीर आहे. त्यामुळे रशियाच्या लसीला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हणत अमेरिकेने रशियाने शोधलेल्या लसीची थट्टा केली आहे. इतक्या वेगाने लस तयार करण्याबद्दल तज्ज्ञांनी देखील शंका उपस्थित केली होती. जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि अमेरिकेतल्या संशोधकांनी याबद्दल सावध राहण्यास सांगितले होते. यानंतर असे वाटतेय की औषधाच्या या स्पर्धेत रशिया आघाडीवर असण्यातला फायदा आमच्या परदेशी सोबत्यांना लक्षात आला आणि म्हणून ते निराधार चर्चा करत असल्याचे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी म्हटले होते.

Protected Content