Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माडगुळकरांच्या स्मारकासाठी १४ रोजी जनआंदोलन

जळगाव प्रतिनिधी । कविवर्य ग. दि. माळगुळकर यांचे स्मारक होण्यासाठी १४ डिसेंबरला माळगुळकरांच्या स्मृतिदिनी काव्यरत्नावली चौकात सकाळी १० वाजता जनआंदोलन करणार आहे.

कविवर्य ग. दि. माळगुळकर यांचे स्मारक होण्यासाठी साहित्यप्रेमींनी ४३ वर्षे खूप प्रयत्न केले; मात्र अजूनही स्मारक झालेले नाही. त्यामुळे १४ डिसेंबरला ग. दि. माळगुळकरांच्या स्मृतिदिनी काव्यरत्नावली चौकात सकाळी १० वाजता जनआंदोलन करणार आहे.

या आंदोलनात घोषणा, निदर्शने न करता महाकवींच्या कविता व गाणे म्हणत एकाच वेळी हे आंदोलन केले जाणार आहे. यादरम्यान कविता वाचन, गीत गायन, चित्ररेखाटणे केले जाणार आहे. यात अशोक कोतवाल, शंभू पाटील, शिवाजीराव पाटील, माया धुप्पड, शशिकांत हिंगोणेकर, वा. ना. आंधळे, डॉ. संजीव कुमार सोनवणे, बी. एन. चौधरी, डॉ. नरसिंग परदेशी, अशोक सोनवणे, गिरीश कुलकर्णी, प्रा. राजेंद्र देशमुख, अशोक कोळी, निरंजन शेलार, विनोद ढगे, हेमंत पाटील, हर्षल पाटील आदी कलावंत सहभागी होणार आहेत.

Exit mobile version