Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘माझी वसुंधरा’ अभियानात चाळीसगाव पालिका विभागातून प्रथम

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे चाळीसगाव नगरपालिकेस ‘माझी वसुंधरा’ अभियानात नाशिक विभागातून पहिला क्रमांक पटकावला आहे.

 

‘माझी वसुंधरा अभियान ३’ अंतर्गत चाळीसगाव न.प मध्ये विविध घटका अंतर्गत केलेल्या कामाबद्दल चाळीसगाव नगरपरिषदेस नाशिक विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे .  दि. ०१ एप्रिल २०२२ ते दि. ३१ मार्च २०२३या कालावधीत केलेल्या कामांना ग्राह्य धरून हा पहिला क्रमांक मिळाला आहे. या कालावधीत प्रशासक राजवट असल्यामुळे या यशाचे श्रेय हे पूर्णपणे प्रशासकीय यंत्रणेलाच असल्याची बाब स्पष्ट आहे.

 

दरम्यान, माझी वसुंधरा मोहिमेत विभागातून पहिला क्रमांक मिळवल्यामुळे चाळीसगाव पालिकेत तब्बल दीड कोटी रूपयांचे पारितोषीक प्रदान करण्यात येणार आहे.

Exit mobile version