Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझी वसुंधरा अभियानांतर्गत वीज निर्मीती अभिनव उपकरणाचे लोकार्पण

 

अमळनेर, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषद कार्यालयात माझी वसुंधरा अभियानांतर्गत वीज निर्मीतीचा अभिनव उपकरणाचे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रम माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील, प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या पर्यावरणपुरक उपकरणाची संकल्पना मांडणारे प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी अभियंता प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन केले. तसेच नवनवीन संकल्पनांसह उपकरणे साकार होण्याची आवश्यकता असल्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यानी मत व्यक्त केले. अभियंता प्रशांत ठाकूर यांनी या उपकरणाची कार्य पध्दती, तसेच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत ऊर्जा या घटकात अमळनेर नगरपरिषदेचा आदर्श ऊर्जा निर्मीती व बचतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रायोजिक तत्वावर उभारण्यात आलेला असून हा प्रकल्प राबविणारी अमळनेर नगरपालिका हि महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका आहे. नागरिकांच्या नगरपरिषदेत येण्यामुळे नगरपरिषदेस ऊर्जा निर्मीती करून देण्यामुळे ऊर्जा बचतीकडे एक पाऊल नक्कीच उचलेले आहे. यामुळे अमळनेर नगरपालिका प्रशासनाने “तुमचे एक पाऊल ऊर्जा निर्मीतीसाठी” हा प्रयोग शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर असलेल्या मार्केट, उद्यान, शासकिय कार्यालये, बँक आदी ठिकाणी राबविण्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी नगरपरिषद उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, ‘माझी वसुंधरा २.०’ चे नोडल अधिकारी व प्रशासन अधिकारी संजय चौधरी, नगर अभियंता अमोल भामरे, डिगंबर वाघ, नगररचना सहायक विकास बिरारी, आबिद शेख आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version