Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह — पंकजा मुंडे

 

मुंबई : वृत्तसंस्था । आम्ही कुणालाच घाबरत नाही, मी कुणाचा  अनादर  करत नाही. माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

पंकजा मुंडे यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा, राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे  यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. मुंबईतील वरळी निवासस्थानावर पंकजा मुंडेंनी खासदार प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी काही सूचक विधाने केली तर काही रोखठोक भाष्य केलं.

 

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू”

 

माझा निवडणुकीत पराभव झाला. आज माझ्याकडे पदाचा अलंकार नाही. स्वाभिमानी राजकारण केले आहे. पंतप्रधानांनी मला झापल्याचं वृत्त काही माध्यमांनी चालवलं. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसं काही दिसतं का? मला पंतप्रधानांनी कधी अपमानित केले नाही. नाही राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हा पर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

 

काळ कधीच थांबत नाही. मी दुःखी नाही. मला काही मिळालं नाही मिळालं एवढ्या चिल्लर गोष्टीवर मी जात नाही. आपली नीतीमत्ता चांगली आहे. आज आपण धर्मयुद्ध टाळण्यासाठी इथे आहोत. अर्जुन, युधिष्ठराने तो प्रयत्न केला. मला आई आणि बापाच्या भूमिकेतून निर्णय घ्यावे लागतात, असं म्हणत पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना धीर दिला.

 

तुमचं पद मला प्रीतम ताईंच्या मंत्रिपदापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आपलं घर आपण सोडायचं नाही. पंतप्रधान मोदींसाठी घोषणा द्या. त्यांना ऐकू जाईल एवढं मोठ्यांनी घोषणा द्या. माझ्या माणसांचे तुकडे पाडण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते सफल होऊ देऊ नका, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

Exit mobile version