माझं राजकीय जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला — संजय राठोड

 

 

अकोला : वृत्तसंस्था । माझं राजकीय जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. माध्यमांनी जे दाखवलं, त्यात कोणतंही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपास करत आहेत. पण, माझ्यासह  समाजाबद्दल घाणेरड राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. चौकशीतून जे समोर येईल. ते बघा…,” असं म्हणत वनमंत्री संजय राठोड यांनी  आज पूजा चव्हाण आत्महत्या मुद्द्यावर मौन सोडलं

 

 

पूजा चव्हाण प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी मौन धारण करत सार्वजनिक जीवनापासून अलिप्त झाले होते. १५ दिवसांनंतर राठोड अखेर आज जनतेच्या नजरेसमोर आले. संजय राठोड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पोहरादेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर मौन सोडलं

 

त्यांनी पोहरादेवी येथे सहकुटुंब जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर सेवालाल महाराजांचंही दर्शन घेतलं. त्यानंतर राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

संजय राठोड म्हणाले, “पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल आम्हाला दुःख. तिच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि समाज सहभागी आहे. मी ओबीसी समुदायाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे.

 

 

भाजपाकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राठोड यांनी राजीनामा देणार नसल्याचंच अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं. “गेल्या दहा दिवसांमध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी चार वेळा निवडून आलो आहे. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. ३० वर्षांपासून काम करतोय. दहा दिवसांपासून अलिप्त होतो. या काळात मी माझे आईवडिल, माझी पत्नी आणि मुलांना सांभाळण्याचं काम करत होतो.  शासकीय काम सुद्धा मुंबईतील फ्लॅटवरून सुरू होतं. माझं काम थांबलेलं नव्हतं. आज इथं दर्शन घेऊन पुन्हा एकदा कामाला सुरूवात करणार आहे,” असं सांगत राठोड यांनी अप्रत्यक्षपणे राजीनामा देणार नसल्याचंच स्पष्ट केलं.

 

 

 

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणानंतर  वनमंत्री संजय राठोड  मंत्रिमंडळ बैठकीला देखील संजय राठोड गैरहजर होते. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा संशय वाढू लागला होता. संजय राठोड यांनी ‘मी १४ दिवस नाही, तर फक्त १० दिवस माध्यमांपासून दूर गेलो होतो, पण मुंबईतल्या माझ्या फ्लॅटमधून माझं प्रशासकीय काम सुरूच होतं’, असं सांगितलं

 

 

 

१० दिवस  बदनामीच्या  पार्श्वभूमीवर माझ्या कुटुंबासोबत, आई-वडिलांसोबत, पत्नी आणि मुलांसोबत मी थांबलो होतो. त्यांना मी वेळ देत होतो. माझे वयोवृद्ध आई-वडील आहेत. माझ्या पत्नीला देखील ब्लड प्रेशर आहे. या काळात माझं कुटुंब सांभाळण्याचं काम मी करत होतो’, असं ते म्हणाले.

 

 

संजय राठोड यांनी मौन बाळगलं असताना महाविकास आघाडीमधील नेते मात्र त्यांची बाजू मांडताना दिसत होते. आज त्यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन करताना “कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला” अशा घोषणाही दिल्या गेल्या .गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागला. मात्र गर्दी कमी होत नसून यावेळी संजय राठोड यांना पाठिंबा दाखवण्यासाठी घोषणा दिल्या  गेल्या .

Protected Content