Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी सैनिकांकडे तीन लाखांची घरफोडी; गुन्हा दाखल

gharfodi

gharfodi

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील इच्छादेवी नगरातील माजी सैनिक संजय राठोड यांचे बंद घरांचे कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटातून तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील इच्छादेवी नगरातील माजी सैनिक संजय प्रताप राठोड (वय-३६) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहेत. मात्र त्यांच्या बंद घरांचे कुलूप व कडीकोंडा तोडून अज्ञाताने घरातील लाकडी कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले १ लाख २० हजार किंमतीचे ४० ग्रॅम वजनाची मंगलपोत, ४५ हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅमची सोन्याची शॉर्ट पोत, ४५ हजार रुपये किंमतीची १५ ग्रॅमची सोन्याची झुंबर, ९ हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅमची सोन्याची झुंबर, १५ हजार रुपये किंमतीच्या ५ ग्रॅमचे कानातले वेल, ३६ हजार रुपये किंमतीच्या १२ ग्रॅमची एक सोन्याची नेकलेस, ३० हजार रुपये किंमतीच्या ६० भार असलेले दोन चांदीचे हातातले कडे व २ हजार पाचशे रुपये किंमतीचे ५ भारचे ब्रेसलेट असे एकूण ३ लाख २ हजार पाचशे रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. हि २९ जानेवारी रोजी सकाळी १२ वाजता ते ३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माजी सैनिक संजय राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३८०, ४५४ व ४५७ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.

Exit mobile version