Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन !

लातूर (वृत्तसंस्था) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निलंगेकर यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, मात्र आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. निलंगा येथे आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा १६ जुलै रोजी लातून येथील खासगी रुग्णालयात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवले होते. येथे त्यांनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली होती. मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार सुरु असताना शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. निलंगेकर हे 1985 ते 86 या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता.

Exit mobile version