Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी महापौरांच्या मुलाची हत्या करणाऱ्या दोन्ही संशयितांना पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे यांचा निर्घृण खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले दोन्ही संशयित आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे (वय २८, रा. शिवाजी नगर ) हा बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास शहरातील शिवाजीनगरातील स्मशानभूमी परिसरातून येत असताना संशयित आरोपी गणेश दंगल सोनवणे रा. वाल्मिक नगर आणि विशाल संजय सपकाळे (साळुंखे) रा. राजाराम नगर यांच्यासह इतर दोन ते तीन जणांनी जुन्या वादातून धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. यात राकेश सपकाळे याचा जागीच मृत्यू झालाय.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी मध्यरात्री संशयित आरोपी विशाल सपकाळे आणि गणेश सोनवणे यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील तलवार, चॉपर, लाकडी दांडा हस्तगत करण्यात आलाय. इतरांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान आज दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version