Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुस्लीम बांधव भाजपात (व्हिडिओ)

वरणगाव दत्तात्रय गुरव | वरणगाव येथील जेष्ठ कार्यकर्ते स्व. कलीम भाई यांचे चिरंजीव  शेख निजाम शेख कलीम यांनी व उत्कृष्ट शायर शेख कलमोद्दीन आरिफ शाहा बुडन शाहा (आन्य) व हिंदू मुस्लिम एकतेचे  मुस्लिम भाई अन्सारी यांनी महाराष्ट्राचे माजी जलसंपदामंत्री  आ गिरिषभाऊ महाजन यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

 

लवकरच वरणगाव शहरात माजी मंत्री आ गिरीषभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत  शेख निजामभाई  यांच्या समर्थकांचा जाहीर प्रवेश सोहळा होणार आहे.  आज माजी मंत्री गिरीष महाजन यांच्या निवस्थानी जाऊन  माजी नगराध्यक्ष सुनील काळे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष  हाजी अल्लउद्दीन सेठ, जिल्हा सरचिटणीस डॉ. सादिक शेख, तालुकाध्यक्ष साबीरभाई कुरेशी, शहराध्यक्ष डी. के. खाटीक, न्याजू सेठ,   भाजपाचे शहराध्यक्ष सुनील माळी, सरचिटणीस गोलू राणे, उपाध्यक्ष नटराज चौधरी, जामनेरचे नगरसेवक नाजीम शेख वसीम खान यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.  यावेळी  शेख निजाम व मुस्लिम भाई अन्सारी ,शायर  शेख कलोमोद्दीन यांनी वरणगाव शहरात भाजपाने चौफेर केलेला विकास हा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. मुस्लिम बहुल  भागात रस्ते, गटार, एलईडी लाईट, 24 बाय 7 च्या 25 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली. आज वरणगावकरांना 24 तास पिण्याचे पाणी मिळणार आहे.  वरणगाव शहरात होणाऱ्या विकासाबरोबर आम्ही जात असून प्रमाणिक व जिद्दीने भाजपा वरणगाव शहरात वाढवणार असल्याचे शेख निजाम शेख कलीम मुस्लिम भाई अन्सारी व शायर शेख कलोमोद्दीन भाई  आरिफ शाहा (आन्य)यांनी यावेळी सांगितले.

 

 

Exit mobile version