Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला कुटुंबनायकांचा सत्कार

 

भुसावळ, प्रतिनिधी । भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भेट देऊन कुटुंबनायकांना शुभेच्छा दिल्या.

लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी अभीष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहुन त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भोरगाव लेवा पंचायतचे सदस्य,सभासद, भुसावळ मतदारसंघाचे माजी आमदार निळकंठ फालक, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, जळगाव महापालीकेचे नगरसेवक सुनील खडके, यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version