Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी खा. डॉ उल्हास पाटील यांची दिवाळी कोविड योध्यासोबत साजरी

जळगाव, प्रतिनिधी | गेल्या दिड वर्षापासून कोरोना आपत्‍तीत दिवसरात्र जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेत कोरोना आपत्‍तीत लढणाऱ्या कोविड योध्यासोबत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिवाळी साजरी करत जिल्हयात नवीन पायंडा पाडला आहे.

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात गेल्या दिड वर्षापासून आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेत कोविड योध्दा म्हणून कार्यरत असलेल्या परिचारीका, डॉक्टर यांच्या सोबत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्या सोबत चिरंजिव अनिकेत पाटील, अतिदक्षता, हदयालय सर्जरी आयसीयु, आणि वार्डात दिवाळी असूनही सेवा देणाऱ्या परिचारीका, डॉक्टर, आणि वार्डबॉय यांच्या सोबत दिवाळी साजरी करत आनंद लुटला.

 

यावेळी रूग्णांना व कोविड योध्दयांना त्यांनी दिवाळी शुभेच्छा देत माता लक्ष्मीचे पूजनही केले. यात गोदावरी नर्सिंग महाविद्यालय व डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी यांचा समावेश आहे. याप्रसंगी अनुक्रमे प्राचार्य मौसमी लोंढे, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, प्रा. पियुष वाघ व प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, प्रशासन अधिकारी राहूल गिरी यांचेसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थीत होते.

Exit mobile version