Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी

फैजपूर प्रतिनिधी । भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हरीभाऊ जावळे यांना जळगावातील व्यक्तीने मोबाईलवर संदेश पाठवत ३३ दिवसानंतर हत्या करण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

भाजपाचे माजी आमदार तथा खासदार हरीभाऊ जावळे यांना राजेंद्र आर.पवार (व्यंकटेश नगर, हरीविठ्ठल रोड, जळगाव) या नामक इसमाने मोबाईलवरून संदेश पाठवत 33 दिवसानंतर खून करण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वीदेखील अनेक राजकीय लोकप्रतिनिधींना राजेंद्र पवार नामक व्यक्तीच्या मोबाईलवरून संदेश पाठवून जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने या इसमाचा शोध घेवून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. खिर्डी येथील तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील यांनादेखील याच क्रमांकवरून मॅसेज आले आहेत. धमकी देणार्‍या इसमाचा पोलिसांनी शोध घेवून त्याच्यावर कठोर कारवाईची करण्याची गरज असून आपला पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्‍वास असल्याचे माजी आमदार हरीभाऊ जावळे म्हणाले. गेल्या अनेक वर्षांच्या राजकारणात कुणाशीही वैमनस्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version