मागील वर्षीच्या नोव्हेंबर व डिसेंबरचा रेशन कोटा वितरीत करा

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील वर्षीच्या नोव्हेंबर – डिसेंबर महिन्याचा रेशनचा कोटा अध्याप तालुक्यातील चैतन्य तांड्याला वितरीत करण्यात आलेला नाही. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून तत्काळ सदर कोटाचा वाटप करावा अशी मागणी माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बहुतांश गावाला मागील वर्षीच्या नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात वितरीत होणारा रेशनचा कोटा पुरवठा विभागाच्या वतीने अध्याप वितरीत झालेला नाही. त्यामुळे दोन महिने उलटले. तरीही कोटाचा वाटप रेशन दुकानदारांना करण्यात आलेला नाही. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यात तालुक्यातील चैतन्य तांड्याला देखील अध्याप वाटप झालेला नाही. म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या मागील वर्षीच्या नोव्हेंबर- डिसेंबर महिन्याची चौकशी करून तत्काळ रेशनचा कोटा गावाला वाटप करावा अशी मागणी माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी तहसील कार्यालयाला निवेदनाद्वारे आज केली आहे.

Protected Content