Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मागील महासभेतील इतिवृत्तावर भाजपाचा आक्षेप ; पीठासन अधिकाऱ्यांना दिले निवेदन (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील ऑनलाईन महासभेत घनकचरा प्रकल्पाच्या प्रस्तावास भाजपाच्या वतीने विरोध नोंदविण्यात आला होता. मात्र, इतिवृत्तात केवळ अॅड. शुचिता हाडा यांचा विरोध दर्शविण्यात आल्याने भाजपा सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. दरम्यान, इतिवृत्तातील घनकचरा व्यवस्थापन विषयला भाजपाचा विरोध कायम असल्याची नोंद घेवून इतर इतिवृत्त कायम ठेवण्यात आले.

 

मागील मह्साभेतील इतिवृत्त कायम करण्याचा प्रस्ताव महासभेत आला असता भाजपा सदस्यांनी यास तीव्र विरोध केला. याबाबत आपली भूमिका मांडतांना अॅड. शुचिता हाडा यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजला सांगितले की, मागील सभेत घनकचरा प्रकल्पला भारतीय जनता पक्षाच्या वतीने  विरोध केला होता. मात्र, इतिवृत्तात राजकीय खेळी करून केवळ माझा एकटीच विरोध दर्शविण्यात आला आहे. त्या सभेत भाजपाच्या सदस्यांनी या प्रस्तावावर वारंवार मतदानाची मागणी केली होती. ठराव क्र. ७४० मध्ये दुरूस्ती करावी. यात भाजपा सदस्यांचा विरोध, मतदानाची मागणी याची नोंद घेऊन प्रस्तावाच्या विरोधात नोंदवावी अशा आशयाचे पत्र देखील आज पीठासन अधिकारी महापौर जयश्री महाजन यांना दिले आहे. हा बेकायदेशीर ठराव शासनाकडे विखंडनासाठी पाठवणार व न्यायालयात दाद मागणार असल्याची भूमिका अॅड. शुचिता हाडा यांनी माडंली. यामागे प्रशासनाची अनास्था असल्याचा आरोप अॅड. हाडा यांनी केला. सत्ताधाऱ्यांची प्रशासनाने दिशाभूल केली असल्याचे मत अॅड. हाडा यांनी यावेळी व्यक्त केले. तर महापौर जयश्री महाजन यांनी या आरोपांना उत्तर देतांना सांगितले की,  ठराव पास झाल्यानंतर विषय पत्रिकेवरील दुसऱ्या विषयावर चर्चा सुरु असतांना भाजपच्या नगरसेवकांनी मतदानाची मागणी केली होती. ते स्वतः चुकीचे पद्धतीने वागतात व याचा आक्षेप घेत पीठासीन अधिकारी हे चुकीच्या पद्धतीने महासभा चालवितात असा आरोप करतात. प्रत्येक महासभेत मी शिक्षिका असल्याची मला वारंवार सभागृहात आठवण करून देण्यात येत असते, मला याची जाणीव असून मी नियमानुसारच महासभा चालवते व चालवत राहणार आहे. मी नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत आहे व यापुढेही घेत राहील अशी भूमिका महापौर महाजन यांनी माडंली. दरम्यान सभागृहातील दीड तासांच्या चर्चेत शिवसेनेचे नितीन लढ्ढा, भाजपचे कैलास सोनवणे, उज्वला बेंडाळे आदी सदस्यांनी भाग घेतला.

 

 

Exit mobile version