Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाला बदडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथ नगरात मागील भांडणाच्या कारणावरुन तरुणाला महिलेसह तीन ते चार जणांनी मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवार, २४जानेवारी रोजी पहाटे सव्वा वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ नगरात सुरज राजरुप राजपूत वय २६ हा तरुण राहतो. त्याच्या घरासमोर मंगलाबाई नावाची महिला वास्तव्यास आहे. २३ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सुरज हा त्याच्या घरासमोर उभा असतांना, मागील भांडणाच्या कारणावरुन मंगलाबाई व इतर जणांनी सुरज यास शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, यात एकाने सुरजच्या डाव्या हातावर चाकू मारुन दुखापत केली, यात घटनेत सुरज जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी सुरजच्या तक्रारीवरुन चार जणांविरोधात मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version