Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मागील भांडणाच्या कारणावरून एकाला धारदार वस्तूने मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून एका शेतकऱ्याला तीन जणांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी यांनी मारहाण करत धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत शनिवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता तीन जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल सांडू पाटील (वय-४९, रा, दहिदुला ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. धरणगाव तालुक्यातील विहीर फाट्याजवळ अंजनी हॉटेल समोर जुन्या भांडणाच्या कारणावरून संदीप शंकर पाटील, वासुदेव शंकर पाटील आणि गोपाल गजानन कोळी (सर्व रा. वाकीटुकी ता.धरणगाव) यांनी अनिल पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच एकाने धारदार वस्तूने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान ‘आमच्या नादी लागला तर तुला बांधून घेऊ’ अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर शनिवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी संदीप पाटील, वासुदेव पाटील आणि गोपाल कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कोळी करत आहे.

Exit mobile version