Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मागील भांडणाच्या कारणावरून तरूणाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भावाच्या मागील भांडणाच्या कारणावरून तरूणाला लाकडी दांडूक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी झाल्याची घटना शिरसोली रोडवरील शेतात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सखाराम आपसिंग बारेला (वय-२१) रा. धामन्या पोस्ट जामठी (मध्यप्रदेश) ह.मु. शिरसोली रोडवरील शेतात जळगाव हा तरूण मुजरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांच्या भावाच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून गेल्या सिताराम बारेला  रा. शिरसोली रोड, जळगाव याने सोमवारी ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सखाराम बारेला याला शिवीगाळ केली. त्यानंतर पाठीमागुन येवून सखाराम बारेलाच्या डोक्यात लाकडी दांडूका मारला. त्यात सखाराम गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी १२ जुलै रेाजी रात्री ११ वाजता गेल्या सिताराम बारेला याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

 

Exit mobile version