मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहातील रिक्त पदे भरा

 

रावेर,प्रतिनिधी । येथील बऱ्हाणपूर रस्त्यावर मागासवर्गीय तथा आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात मंजूर पदांपैकी ५ पदे रिक्त असून ती त्वरित भरण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मागासवर्गीय तथा आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील मुलींच्या प्रवेशाची क्षमता ६० विद्यार्थी एवढी आहे. या वसतिगृहासाठी एकूण ९ पदे मंजूर असून त्यापैकी ४ पदे भरलेली आहेत तर ५ पदे अनेक दिवसांपासून रिक्त असल्याने त्याचा ताण इतर कामकाजावर होत आहे. विद्यार्थिनींना सुविधा उपलब्ध करून देतांना अडचणी निर्माण होत असतात. या वसतिगृहात गृहपाल-१, कनिष्ठ लिपिक -१, स्वयंपाकी-१, मदतनीस-१, अशी पदे भरलेली आहेत. तर स्वयंपाकी, मदतनीस, शिपाई, पहारेकरी, सफाईगार अशी ५ पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

गृहपाल ८ वर्षापासून तळ ठोकून

येथील या वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमारी एल. एम. घाटे या आठ वर्षापसून येथे तळ ठोकून आहेत. त्यांची बदली झाली होती. मात्र प्रशासनाने बदली रद्द केली असल्याची माहिती गृहपाल घाटे यांनी दिली. दरम्यान, यापूर्वी सुद्धा घाटे यांची बदली झाल्यावर ती रद्द करण्यात आल्याची माहिती संबधित विभागाकडून समजली आहे.

Protected Content