Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम आलेल्या विद्यार्थीनीस पाच हजाराचा धनादेश प्रदान

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले हायस्कूलची विद्यार्थीनी हर्षाली सुनिल पाटील ही ‘एसएससी मार्च – २०१९’ च्या परीक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून  प्रथम आली होती. तिला नुकताच महाराष्ट्र राज्य समाज कल्याण विभाग जळगाव यांच्याकडून आलेला पाच हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला.

 

सदर धनादेश शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. महाजन यांच्या हस्ते कु. हर्षाली पाटील व तिचे वडील सुनिल पाटील ( कल्याणे होळ ) यांच्या हातात सुपूर्त करण्यात आला. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक – एस.आर. महाजन , पर्यवेक्षिका -सौ. पी.आर. सोनवणे , वर्गशिक्षक एस.व्ही.आढावे व सर्व शिक्षक बंधु – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. सर्वांच्या वतीने हर्षालीचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version