महेलखेडीच्या हागणदारीमुक्ती पुरस्कारावर प्रश्नचिन्ह

 

 

यावल :  प्रतिनिधी  ।  महेलखेडी गावातील विविध समस्या आणि सार्वजनिक शौचालयांच्या दुर्दशेने या गावाला मिळालेल्या हागंदारीमुक्तीच्या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह लावले आहे

 

तालुक्यातील महेलखेडी  गावाच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामस्थ नागरी समस्यांनी ग्रस्त झाल्याचे चित्र असुन महेलखेडी गाव या आधीच हागणदारीमुक्त जाहीर झालेले असले तरी आता  गावातील सार्वजनिक शौचालयाचे अक्षरश: बारा वाजले  आहेत  हागणदारीमुक्तीचा  पुरस्कार हा निव्वळ देखावा होता की काय असे चित्र  असुन आजही महिलांना रस्त्याच्याकडेला  नैसर्गिक विधीसाठी उघड्यावरच जाण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतच्या परिसरात झाडें झुडपे असुन त्याच ठिकाणी असलेली कूपनलिका   बंद  आहे. त्याचप्रमाणे गावातील गुरेढोरे यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था असलेल्या हौदाची  दैना झाली आहे   त्याच ठिकाणी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची टाकी असून तिला गळती लागली आहे. बहुतांशी नळ  बंद असल्याने पुरुष व महिला शौचालय बंद अवस्थेत आहेत  ग्रामस्थांची पाण्याअभावी मोठी गैरसोय  झाली आहे

 

आता  ग्रामपंचायतीची सत्ता परिवर्तन पॅनलच्या  महिलांच्या हाती आली असल्याने  महिलांचे प्रश्न प्राधान्याने  मार्गी लागतील अशी अपेक्षा महिला वर्गात व्यक्त करण्यात येत आहे

.सध्या कोविड  महामारीच्या संकटात नागरीकांच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल  युद्धपातळीवर आरोग्य  यंत्रणा कार्यरत असून गावात उपाययोजना आखणी करणे गरजेचे आहे

 

Protected Content