Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेसह तीन जणांना चौघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा रागातून ४ जणांनी महिलेसह तिच्या मुलगा, मुलगी यांना शिवीगाळ दमदाटी व मारहाण करून दुखापत केल्याची घटना अजिंठा चौफुलीजवळ कब्रस्तान येथे घडली आहे. याप्रकरणी  एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कल्पना रामचंद्र ब्रम्हाणे (वय-४०, रा. खेडी ता. जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार १५ मार्च रोजी रात्री ११ वाजता कामाच्या निमित्ताने त्या जळगाव शहरातील अजिंठा चौक जवळील कब्रस्तान येथून मुलगा आदित्य, मुलगी प्रेरणा व सोबत असलेला किरण रगडे यांच्यासोबत येत होते. दरम्यान पोलिसात तक्रार दिल्याचा रागातून विनोद निकम, चेतन नंदू महाले, प्रतीकराज दिलीप चव्हाण आणि दिलीप यशवंत चव्हाण या चौघांनी शिवीगाळ करून दमदाटी केली नंतर चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. आदित्य ब्रम्हणे याच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर गुरुवार १६ मार्च रोजी दुपारी २ वाजता महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेला तक्रारीवरून संशयित आरोपी विनोद निकम, चेतन नंदू महाले, प्रतीकराज दिलीप चव्हाण आणि दिलीप यशवंत चव्हाण या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. सुनील सोनार करीत आहे.

Exit mobile version