Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेच्या पर्समधून ७० हजारांची रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील ७० हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे शुभांगी सुरेश बडगुजर वय ४२ वास्तव्यास आहेत. त्या शिक्षीका आहेत. २० मे रोजी शुभांगी बडगुजर ह्या जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. खरेदी करत असतांना दुपारी एक ते दीड वाजेच्या दरम्यान त्यांच्या पर्समध्ये ७० हजारांची रोकड असलेले पाकिट गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फुले मार्केट मध्ये कुठे पडले असावे अशी शंका आली, त्यानुसार त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र रोकड असलेले पाकिट मिळून आले नाही. अखेर चार दिवसानंतर शुक्रवार, २५ मे रोजी शुभांगी बडगुजर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे हे करीत आहेत.

Exit mobile version