Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेच्या घरातून ५ लाख ३० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील घरातून ५ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून येण्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात एका संशयित महिलेवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनीता नरेंद्र मोरे (वय-४८) रा. राजमाती नगर जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास राजमलती नगरात राहणारी स्वाती किशोर कांबळे या महिलेने घरातून पितळी डब्यात ठेवलेले ५ लाख ३२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या संशय व्यक्त केला आहे. याबाबत सुनीता मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात रविवारी १६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता संशयित स्वाती किशोर कांबळे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल करीत आहे.

Exit mobile version