Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेच्या घरातून मोबाईल लांबविला

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कस्तुरी नगरात बंद घरात महिलेचा ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाई अफसर गायकवाड (वय-४५) रा.कस्तूरीनगर, जामनेर आपल्या कुटुंबीयांच्या वास्तव्याला आहे. ४ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील सर्व मंडळी झोपले असताना. त्यांच्या गल्लीत राहणारा रामा तुकाराम खाटीक याने घरात घूसून ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून रामा तुकाराम खाटीक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जयेंद्र पगारे करीत आहे.

Exit mobile version