Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दोन भामट्यांनी लांबवली.

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भडगाव शहरातील हॉटेल जयराज जवळ एका महिलेच्या गळ्यातून अज्ञात २ जणांनी ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरीस्कावून चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याबाबत रविवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अर्चना महेश पाटील (वय-४२) रा. एकविरा नगर, भडगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या नातेवाईकांकडे साखरपुडा होता. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून त्या घरी पायी येत असताना त्यांच्या मागून दुचाकीने अज्ञात दोन जण येऊन त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत तोडून पसार झाले. महिलांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत दोघी भामटे सोन्याची पोत घेऊन फरार झाले होते. या संदर्भात अर्चना पाटील यांनी सायंकाळी ५ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नाईक करीत आहे.

Exit mobile version