Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेच्या गळ्यातील मंगलपोत चोरट्यांनी धूमस्टाईल लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गुलमोहर कॉलनी येथे अंगणात उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर येऊनजबरी हिसकावून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवार 7 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता आज्ञा चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनीता गोकुळ बोरसे (वय-49) रा. गुलमोहर कॉलनी, अमळनेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी 7 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता त्या घराच्या अंगणासमोर उभे असताना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर आले. त्यांनी सुनीता बोरसे यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे 50 हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्र जबरी हिसकावून दुचाकीने पसार झाले. त्यांनी आरडाओरड केल, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेनंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री 10 वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंगन वाघ करीत आहे.

Exit mobile version