Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेच्या गळ्यातील मंगलपोत जबरी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सरला शरद झोपे (वय-४८) रा. नंदनवन कॉलनी, भुसावळ या महिला शनिवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पुरूषोत्तम नगर येथून नंदनवन कॉलनीकडे येत असतांना रस्त्यावर एक अनोळखी व्यक्ती जवळ आला. जवळ येताच त्याने महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत जबरी हिसकावून चोरून नेली. महिलेने आरडा ओरड केली, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मुऱ्हे करीत आहे.

Exit mobile version