Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलेची पावणेआठ लाखात ऑनलाईन फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँकेतून बोलत असून आमच्या बँकेत असलेली फिक्स डिपॉझिट अपडेट करायची आहे. असे सांगून महिलच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांकाविचारुन महिलेला पावणेआठ लाखात गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २१ मार्च रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील ढाके कॉलनीत लिना राजेंद्र भोळे या वास्तव्यास असून त्यांची बंधन बँकेत फिक्स डिपॉझिट आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांना फोन आला. समोरील व्यक्तीने आपण बंधन बँकेतून बोलत असून त्याने भोळे यांना त्यांच्या फिक्स डिपॉझिटबद्द माहिती सांगितली. तसेच तुमची एफडी अपडेट करायची असून तुमच्या मोबाईलवर एक मॅसेज येईल. तो मॅसेज त्या इसमाने त्याच्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यास सांगितला. लिना भोळे यांना त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास झाल्याने त्याने त्यांच्या मोबाईलवर आलेला मॅसेज त्या इसमाला पाठविला.

 

भोळे यांनी त्या इसमाला मॅसेज पाठविल्यानंतर काही वेळातच महिलेच्या खात्यातून पैसे कपात झाल्याचा त्यांना मॅसेज प्राप्त झाला. बँकेतून पैसे कपात झाल्याचे समजताच लिना भोळे यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. भोळे यांनी लागलीच बँकेत तक्रार करुन खाते ब्लॉक करुन घेतले. त्यानंतर सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी २१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version