Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला शिक्षण त्यांच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले यांनी अखंड लढा दिला- मुख्याध्यापक अनिल महाजन

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महिलांच्या शिक्षण व उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले यांनी अखंड लढा दिला. पुरोगामी महाराष्ट्रात फुले दाम्पत्य भारतरत्न पुरस्कारापासून वंचित आहेत यांच्यासारखे दुर्भाग्य कोणतेच नाही अशी खंत महात्मा फुले हायस्कूल देवगांव-देवळीचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी अध्यक्षस्थावरून व्यक्त केली.

 

याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ क्रीडाशिक्षक अरविंद सोनटक्के, शिक्षक एस. के महाजन एच,ओ माळी होते. मुख्याध्यापक अनिल महाजन पुढे म्हणाले की, ज्यांनी देशात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली अशा सावित्रीबाई फुले यांचे कार्य तमाम महिलावर्गाला प्रेरणादायी आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. इयत्ता आठवीतील भाग्यश्री पाटील ,गायत्री भिल, जयश्री पाटील, श्‍वेता बैसाने, वैष्णवी माळी , इयत्ता नववी राजश्री पाटील ,प्रणाली पाटील ,भाग्यश्री पाटील, संजना पाटील ,स्नेहल पाटील, हर्षला पाटील, गायत्री पाटील इयत्ता दहावी वैशाली पाटील, रोशनी पाटील, श्वेता पाटील, गायत्री पाटील, रजनी माळी, यशस्वी पाटील या सर्व विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत गीत सादर केले. स्काऊट शिक्षक एच. ओ. माळी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सुत्रसंचालन आय. आर. महाजन यांनी केले.आभार एस. के. महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Exit mobile version