Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला व बालकल्याण समितीने केली त्या प्रकरणाची चौकशी !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील १२ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी महिला व बालकल्याण समितीने शाळेला भेट देऊन याची माहिती जाणून घेतली.

नुकतीच तालुक्यातील एका घडलेली दुर्दैवी घटना आणि त्यातून अगदी वय वर्ष १२ असलेल्या पीडित बालिकेची गर्भधारणा आणि त्यातुन तीने बाळाला जन्म देणे याबतीत यावल पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. अशीच अजुन एक घटना गावात घडलेली आहे त्याबतीतही संबंधित यंत्रणा अपयशी झाल्याच निदर्शनास येत आहे. ज्या वयात शिक्षण घेणे व बालपण जगणे अपेक्षित असताना तीच्यावर हे बाळतपण लादले गेले.

असा अपराध घडतो, मुलगी गर्भवती होते, तिचे शिक्षण थांबते तिच्या सर्वच हक्कांची पायमल्ली होते तरी गाव स्तरावर कोणत्याच यंत्रणेला याचा थांग पत्ता नाही . यात आरोपी सोबत ह्या यंत्रणा सुद्धा तेवढ्याच दोषी आहेत कारण अश्या घटना घडू नये म्हणून गाव स्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती कार्यरत असते तसेच सोबत बालक शिक्षणापासून वंचित राहू नये त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती असते तसेच नवीन शासन निर्णयानुसार सखी सावित्री समिती असते मात्र पैकी कोणत्याच व्यवस्थेस मुलगी पृसूती होऊन बाळाला जन्म देईपर्यंत काहीच कल्पना नसणे हे अनाकलनीय आहे.

या धर्तीवर जिल्हा महिला व बाल कल्याण समिती आता सर्वच स्तरावरून याबतीत सखोल चौकशी करुन जे संबधित अहेत त्यांच्यावर बाल लैंगिग अत्याचार प्रतिबंध कायदा म्हणजेच पोक्सोनुसार कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं तपासातील पुढील भाग म्हणून संबधित पीडिता शिक्षणापासून का वंचित राहिली व तीची शैक्षणिक प्रगती व संबंधित बाबी तपासणी साठी जिल्हा महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ऍड देवयानी गोविंदवार यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे प्रमुख सदस्य संदीप निंबाजी पाटील, ऍड सौ विद्या बोरणारे, सौ. वृषाली जोशी आणी सर्व समिती सदस्यांसह त्या मुलीच्या शाळेला भेट दिली.

या भेटीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करुन शाळेचा पट आणि शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या यातील तफावत याबाबत शाळा म्हणून काय प्रयत्न झाले याविषयी विचारणा करण्यात आली. तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि तीच्या भूमिका तसेच घेतलेले निर्णय व बैठका ह्या बाबतीत चौकशी केली. शाळा बाह्य मुले शाळेत दाखल करण्यासाठी यांची काय भूमिका आहे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काय उपाययोजना केल्या आहेत याचेही दस्तऐवज मागितले आहे . यशिवाय गावात आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे त्यांच्या मुलांची शैक्षणिक स्थिती काय आणि प्रवेशीत किती व शाळा बाह्य किती आणि हे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणुन शाळा व शाळा व्यवस्थापण समितीने काय कारवाई केली या बाबतीत चौकशी केली.

दरम्यान जिल्हा महिला व बाल कल्याण समितीमधील महिला सदस्यांनी शाळेतील मुलींच्या प्रसाधन गृहाची अनेक दिवसापासून साफसफाई झालेली नसल्याने तिथे सर्व मैला व घाण तशीच पाडून असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर समस्या निर्माण होऊ शकते आणि मुलीना उघड्यावर जावे लागते कारण यासाठी कुठलीच पर्यायी व्यवस्था नसल्याने यावर तात्काळ कारवाईचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले. तसेच पुन्हा असे होऊ नये यासाठी कायमची उपाययोजना करण्यास सांगितले.

Exit mobile version