Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलांमध्ये जनजागृतीसाठी ‘सायबर लॉ’ विषयावर ८ मार्चला व्याख्यान !

जळगाव (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनानिमित्त १ मार्च पासून जळगाव जिल्हा महिला असोसिएशनद्वारा विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याच कार्यक्रमांतर्गत महिलांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने माहिती व तंत्रज्ञान कायदा ( सायबर लॉ) या विषयावर सायबर क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांचे व्याख्यान दि.८ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे.

 

जागतिक महिला दिननिमीत्त  दि.८ मार्च रविवारी  ‘सायबर लॉ ‘ विषयावर सायबर क्राईम ब्रांच पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांचे जनजागृतीपर व्याख्यान  दुपारी ४ वा. काव्य रत्नावली चौकात होणार आहे. तसेच ‘यु ट्यूब’ वर वाढलेल्या अश्लील विडिओ बाबत सरकारद्वारा कठोर कायदे करणे, पॉर्न साईटवर प्रतिबंधसाठी स्वाक्षरी अभियान दुपारी २.०० वाजेपासून राबविण्यात येणार आहे. जागतिक महिला सप्ताह अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण स्टेट लेव्हल व्हॉलीबॉल खेळाडू अंजली पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी दि.४ मार्च रोजी काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहेत. दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमारी बाल्दी यांनी केले आहे. तर  या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी बिंदीया नांदेडकर (मो. ७०२०३४४७२४) यांच्याशी संपर्क करावा,असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version