Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : नगराघ्यक्ष परदेशी

 

एरंडोल, प्रतिनिधी । महिलांसाठी असलेल्या विविध आर्थिक व बचत गटांच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंनिर्भर होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत ,एरंडोल तालुका व आस्था महिला मंडळ आणि सुखकर्ता फाऊंडेशन ह्यांच्या विद्यमाने एरंडोल येथील नचिकेत इमेजींग सेंटर येथे जागतीक महिला दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधूनं गर्भवती महिलांसाठी पोषक आहाराबद्द्ल मार्गदर्शन व त्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील,माजी नगरसेवक नरेंद्र पाटील, डॉ.राखी काबरा, पत्रकार कुंदन ठाकुर, डॉ. प्रशांत पाटील, नंदा शुक्ला, चंद्रकला जैन, संध्या महाजन, मीना काडे, चित्रा सोनार, नगरसेविका छाया दाभाडे, लता चौधरी, रत्ना नीता महाजन, पूजा साळी, इंदिरा साळी आदी उपस्थित होते.  येणाऱ्या जागतीक किडनी दिनानिमित्ताने अवयवदानाचे संदेश असलेले पत्रिकेचे विमोचन नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थीतीत करण्यात आले. याप्रसंगी अवयवदानाची उपयुक्तता त्यातील महिलांची भूमिकां याबद्दल सुखकर्ता फाऊंडेशन चे डॉ.नरेंद ठाकूर ह्यानी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे हे उपस्थित होते. यावेळी आस्था महिला मंडळ व ग्राहक पंचायत सभासदांची उपस्थीती होती. यशस्वीतेसाठी किसन गवळी, राहुल शिंदे, मनीषा पंचाळ, मंगला पाटील, निशि धिसाडी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version