महिलांची छेड काढणाऱ्या परप्रांतीयाला नागरीकांकडून चोप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकामध्ये एका परप्रांतीय व्यक्तीने तीन ते चार महिलांची छेड काढल्याची घटना सोमवार १५ मे रोजी दुपारी चार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली. परप्रांतीला चोप देत नागरिकांनी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

अधिक माहिती अशी की, नवीन बसस्थानकामध्ये महिला फोनवर बोलत असताना परप्रांतीय व्यक्तीने अचानक तिच्याजवळ येऊन तिची छेड काढत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर बस स्थानकातील इतर नागरिकांनी पुरुषाला पकडले तसेच त्याला चोप देत जिल्हा पेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान या परप्रांती व्यक्तीने नवीन बस स्थानकात अशाच प्रकारे दोन ते तीन महिलांची छेड काढल्याची माहिती मिळाली आहे याप्रकरणी उशिरापर्यंत जिल्हा पेठ पोलिसांची कारवाई सुरू होती. या घटनेने नवीन बस स्थानकात मोठी खळबळ उडाल्याच पाहायला मिळालं

Protected Content