Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महावीर पब्लिक स्कूलमध्ये गुणगौरव सोहळा उत्साहात

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महावीर पब्लिक स्कूलमध्ये विविध स्पर्धा आणि परिक्षांमध्ये यश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

 

या कार्यक्रमास पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री इंगळे, शाळेचे चेअरमन प्रदीप लोढा, उपाध्यक्ष तेजराज जैन, सचिव दीपक लोढा, उपसरपंच व संचालक श्याम सावळे, सहयोगी संचालक शैलेश पाटील, संचालक पंकज लोढा, विपीन लोढा, कृषी पंडित पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव काका पांढरे, गावंडे, ईश्वर बारी, अशोक घोंगडे, राजू जेंटलमॅन, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

सर्वप्रथम महावीर भगवान व स्वर्गीय काकाची यांच्या प्रतिमेस माल्यअर्पण व सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी उत्कृष्ट मार्कने राज्य पातळीवर आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पारितोषिके देण्यात आले. मार्गदर्शक शिक्षक नेमाडे मॅडम, दिपाली पाटील, कंडारे मॅडम, लाड मॅडम, वर्षा वैदकर मॅडम, यांचे सत्कार करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. आर. कुलकर्णी यांचा सत्कार प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चव्हाण सर, आसिफ सर यासह शाळेतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. श्याम सावळे यांनी आभार मानले.

Exit mobile version