महावीर पतसंस्थेचे व्यवस्थापक १५ दिवसाच्या सक्तीच्या रजेवर….?

चोपडा, प्रतिनिधी । मागील वर्षांभरापासून महावीर नागरी सह.पतपेढी चोपडाच्या गैरव्यवहाराबाबत अनेकांनी तक्रारी केल्या असल्याने विद्यमान व्यवस्थापक राजेंद्र जैन यांची चांगलीच डोकेदुखी वाढत होती आणि संस्थाचालकाकडून कोणतेही कागदपत्रे कोणालाही पुरवू नये असे तोंडी निर्देश देण्यात आल्याचे बोलले जात आहे त्यामुळे राजेंद्र जैन यांची चांगलीच गोची फसली असल्याने संस्थाचालकानीच व्यवस्थापक राजेंद्र जैन यांना १५ दिवसासाठी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे

सविस्तर असे की, तत्कालीन व्यवस्थापक सौ शोभा सुरेश सांखला यांनी संस्थापक चेअरमन व चेअरमन यांचे व यांनी घेतलेले नातेवाईक, कर्मचारी तसेच इतर लोकांच्या नावावरील कोट्यवधीचे कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड व्हावी यासाठी सौ शोभा सांखला यांनी गट नं.७४८ या मिळकतीवर (जवळपास दीड लाख स्वे. फूट ) वर बोजा चढविला होता व त्यात संस्थापक चेअरमन यांच्याकडून स्टॅम्पपेपरवर संपुर्ण कर्जासाठी हमीपत्र देखील लिहून घेतले होते. परंतु विना पैसे भरून हा बोजा उतरून दयावा असा आग्रह संस्थापक चेअरमन यांच्या असल्याने तत्कालीन व्यवस्थापक सौ शोभा सांखला व संस्थापक चेअरमन यांच्यात वाद होत गेले त्यामुळे सौ शोभा सांखला यांच्या अडसर दूर व्हावा यासाठी व्यवस्थापकपदाचा पदभार हस्तांतरीत करण्यात आले. तद्नंतर संस्थापक चेअरमन यांच्या मर्जीतला व गैरव्यवहाराला साथ देणारे यावल रोड शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र जैन यांना मुख्य शाखेचे व्यवस्थापक पद बहाल करण्यात आले. पदावर आरूढ झाल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आत व्यवस्थापक राजेंद्र जैन यांनी गट नं.७४८ चा बोजा विना पैसे भरता उतरून दिला. त्यामुळे सौ शोभा सांखला , प्रविण जैन, लतीश जैन यांनी अनेक तक्रारी अर्ज केल्या आहेत. तसेच तुकाराम हेमा पाटील यांनी २००२ मध्ये वाटलेला डिव्हिडंट पैकी सोन्याच्या नाणेची आर्डर जिल्हा उपनिबधकाकडून आणल्या नंतर देखील या शेतकऱ्याला हक्काचे नाणे देखील मिळत नाही. उडवाउडवीची उतरे देऊन त्यांना माघारी पाठविण्यात येते. एकीकडे शेतकऱ्यांसाठी राज्य शासन,केंद्र शासन इतके संवेदनशील असल्यावरही मात्र पतसंस्थाच्या व्यवस्थापक राजेंद्र जैन यांची मुजोरी इतकी की जिल्हा उपनिबंधकाच्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवली अश्या अनेक तक्रारी व ठेवीदार आपले ठेवी मागण्यांसाठी येत असल्याने राजेंद्र जैन याची ससेमिरी वाढून गेली होती. त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी संस्थापक चेअरमन श्री बोथरा चेअरमन सौ बोथरा यांना कळविले असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून राजेंद्र जैन यांना दि.३१ तारखेपासून १५ दिवस सक्तीच्या रजेवर जावे असा सल्लाही देण्यात आल्याचे बोलले जात आहे. व्यवस्थापक यांना जरी सक्तीच्या रजेवर पाठविले असले तरी सत्य किती दिवस लपविणार ? अशी चर्चा शहरात सुरू आहे याबाबत तक्रारदार पुणे येथील आयुक्त कार्यलयात दाद मागणार आहे.

Protected Content