Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविद्यालये पुन्हा गजबजली ; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यार्थ्यांचे स्वागत (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ११ महिन्यापासून बंद असलेली महाविद्यालये आज पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महाविद्यालयीन तरुणांवर पुष्प वर्षाव व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या, परंतु महाविद्यालये सुरू करण्यात आली नव्हती. ती सुरू करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आंदोलन छेडण्यात आले होते. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुचनेनुसार पुन्हा महाविद्यालये आज सोमवार १५ फेब्रुवारी पासून पुन्हा सुरु झाली आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर अखील भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. यासाठी एम.जे. कॉलेजच्या प्रवेश द्वारावर रांगोळी काढण्यात आली असून विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचा स्वागत करण्यात आले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिध्येंश्वर लटपटे, महाविद्यालय अध्यक्ष रितेश महाजन, नगर विद्यार्थीनी प्रमुख वर्षा उपाध्ये, कला शाखा प्रमुख कुणाल कोळी, जिल्हा सयोजक रितेश चौधरी, महानगर मंत्री आदेश पाटील,प्रज्वल पाटील, चिराग तायडे, अश्विन वाघ, मयूर अलंकारी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य गौरवी चौधरी, हेमांगी पाटील, पवन भोई, जितेश चौधरी, चैतन्य बोरसे,जयदीप शिंपी आदी उपस्थित होते.

 

 

 

Exit mobile version