Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महावितरण हल्ला प्रकरणी मुख्य सुत्रधारास तात्काळ अटक करा: अमोल शिंदे (व्हिडिओ)

पाचोरा नंदू शेलकर । पाचोरा- भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात ७ जून २०२१ रोजी महावितरण विरोधात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात ताला ठोको आंदोलन केले. या आंदोलनात भडगाव महावितरण कार्यालयात झालेल्या तोडफोडीत एका महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात येवून सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होत. यात ६ जणांना अटक झाली होती. सर्व संशयित आरोपी हे आमदाराचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराला अटक करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

 

अमोल शिंदे यांनी पुढे सांगितले की, अटक झालेल्या सर्व आरोपींचा हा कट पूर्वनियोजित होता. अटक करण्यात आलेले आरोपी पाचोरा येथील आंदोलनात आमदार महोदयांसमवेत हजर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तद्नंतर आंदोलन संपल्यावर सर्व महावितरण अधिकारी व कर्मचारी आप-आपल्या जागी कामासाठी पोहोचले असल्याचे कळताच आरोपींनी भडगांव गाठले व अंत्यत नियोजनबध्द पध्दतीने हा गंभीर गुन्हा केला.  ताला – ठोको आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल होवु नये याबाबत जशी काळजी घेण्यात आली होती. तशी काळजी भडगाव हल्ला प्रकरणी कोणीतरी सुत्रधाराने घेतली होती. अटकेत असलेले सर्व आरोपी आमदार किशोर पाटील यांच्या विश्वासातले व जवळचे आहेत. विशेष म्हणजे आरोपी शिवसैनिक असुन ते शिवसेना, युवासेनाचे आजी – माजी पदाधिकारी व आमदारांचे निकटवर्तीय आर्थिक लाभार्थी आहेत. घटनेतील सर्व आरोपी पाचोरा येथील आंदोलनाच्या वेळी आमदाराचा सोबत उपस्थीत दिसतात. त्यानंतर त्यांचे भडगांव येथील महावितरण कार्यालयात जाण्याचे प्रयोजन काय ? ते भडगावचे रहिवाशी नाहीत. आरोपी भडगावचे शेतकरी किंवा विज ग्राहक आहेत का ? हल्ला करतांना सर्व आरोपींनी तोंडाला मास्क लावुन चेहरा लपवण्याचे प्रयोजन काय ? गुन्ह्यात वापरलेल्या मोटर सायकलींचे नंबर प्लेट झाकणे व बदलणे यांचे काय कारण ? घटनास्थळी गेल्यावर कोणाच्या इशाऱ्यावरुन त्यांनी विशिष्ठ अधिकाऱ्याचे नांव विचारले ? अजय धामोरे यांना लक्ष्य करुन त्यावर जिवघेणा हल्ला का केला ? या हल्ल्यात अडसर ठरलेले निष्पाप गजानन राणे यांच्या मृत्युला आरोपी सोबतच सुत्रधार जबाबदार नाही का ?  या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदार किशोर पाटील यांनी देणे गरजेचे आहे. हे सर्व कृत्य सदर आरोपींनी कोणीतरी सुत्रधाराच्या सांगण्यावरून केले आहे, या संपुर्ण घटनेचा मुख्य सुत्रधार शोधुन त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी दि.०७ रोजी प्रत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत केली होती.  आमदारांची तीच मागणी अमोल शिंदे यांनी या प्रत्रकार परिषदेत केली. कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याचा निष्पाप बळी आरोपींनी घेतला असून त्यांच्या या कृत्यामुळे आजच त्या कर्मचा-यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. घटनेच्या मुख्य सुत्रधाराच्या या कृत्यामुळे राज्यभरात पाचोरा व भडगाव तालुक्याची प्रतिमा मलीन झाली असून शिवसेनेच्या वाढत्या गुंडगिरीमुळे पाचोरा व भडगाव तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे आणि या दहशतीने जनतादेखील भयभीत झालेले आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार यास अटक झाल्यावरच मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला व जखमी झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खरा न्याय मिळेल व मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला शासनस्तरावरुन ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देवुन त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस महावितरण कंपनीत तात्काळ नोकरी देण्यात यावी असे ही भाजपा  तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेतकेली. यावेळी भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, पाचोरा शहराध्यक्ष रमेश वाणी उपस्थित होते.

 

 

 

Exit mobile version