Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महावितरण कार्यालयासमोर ठेकेदारांचे आमरण उपोषण ! (व्हिडिओ)

जळगाव संदीप होले । महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आणि उपकार्यारी अभियंता सुकेश बिराजदार यांनी महावितरणच्या कामांची निविदा मॅनेज करून ठेकेदारांकडून कामाचे देयके मिळण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैश्यांची मागणी केल्याचा  प्रकार होत आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्यांची अद्यापपर्यंत कोणतीही चौकशी वा कारवाई करण्यात आलेली नाही. याला कंटाळून सर्व ठेकेदारांनी आजपासून महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. 

 

महावितरणचे कार्यकारी अभियंता व उप कार्यकारी अभियंता  सुकेश बिराजदार या दोघांनी संगनमताने निविदा मॅनेज करून आमची सर्व ठेकेदारांची आर्थिक लुबाडणूक करीत आहे. तसेच सदर प्रकारामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. झालेल्या कामाचे देयके मिळण्यासाठी ठेकेदारांकडून अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी करण्यात येत आहे व संबधित  कार्यकारी अभियंता यांच्या कार्यकाळातील प्रसिद्ध केलेल्या निविदांची चौकशी व्हावी. आम्ही निविदा सादर केली असता त्यांच्या पदाचा गैरवापर करून निविदा रद्द करतात. याबाबत भरपुर लोकांनी अर्ज केले आहेत, पण संबंधित कार्यकारी अभियंता यांच्यावर कुठलीही कार्यवाही झालेली दिसत नाही. तसेच निविदा प्रणाली मध्ये वेळोवेळी बदल करून त्यांच्या सोयीनुसार पदाचा गैरवापर करून मोठया प्रमाणात कंपनीचे नुकसान करून भ्रष्टाचार केला आहे. तसेच अंदाज पत्रकात दर्शवलेल्या वस्तु ऐवजी बाजारात उपलब्ध नसलेल्या वस्तुची मागणी करून व अंदाज पत्रकात दर्शवलेल्या नसुन सुद्धा त्याच ठराविक ब्रांडच्या वस्तुची मागणी करण्यात येत आहे. तरी  लवकरात लवकर लक्ष घालुन सखोल चौकशीचे आदेश द्यावे व आम्हास न्याय मिळावा. त्यामुळे आमची आर्थिक पिळवणूक होणार नाही व त्यांची आमच्याकडे पैशांची मागणी बंद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. उपोषणात  भाग्येश ढाकणे, हर्षल सोनवणे,विवेक खर्च, निलेश चौधीर आदी सहभागी झाले आहेत.

 

 

Exit mobile version