Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महावितरण कार्यालयासमोरून शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील महावितरणच्या कार्यालयासमोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटनासमोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

किरणसिंग कृष्णाजी पाटील वय२८ वर्ष शेतकरी राहणार शिवाजी नगर यावल हे २४ जुन रविवार रोजी चोपडा रोड वरील साईबाबा मंदीर,जवळ महावितरण कंपनीच्या कार्यालया समोर (एमएच १९ सिएन ६५४३) या क्रमांकाची सुमारे २० हजार रुपये किमती बजाज पल्सर ही मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .

दरम्यान यावल शहरात व परिसरात मागील काही दिवसापासुन शेती साहीत्य व आठवडे बाजारच्या दिवशी नागरीकांचे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनेत वाढ झाली असुन, पोलीस प्रशासनाने या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे .

Exit mobile version