महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांची चोरी

पहूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर  येथून जवळ असलेल्या पिंपळगाव धरण येथे महावितरण कंपनीची इलेक्ट्रीक डीपीवरील ३० हजार ६०० रुपये किमतीचे विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पहूर  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहूर गावापासून जवळ असलेल्या पिंपळगाव धरण येथे महावितरण कंपनीची इलेक्ट्रिक डीपी आहे. त्याठिकाणी महावितरणच्या मालकीचे ३० हजार ६०० रुपये किमतीचे लघुदाब वीज तार ठेवण्यात आले होते. दरम्यान २३ मार्च सायंकाळी ५ ते २४ मार्च सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लघुदाब वीजेच्या तारांची चोरी केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महावितरण कर्मचारी मोहन नामदेव सोनवणे यांनी पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किरण शिंपी करीत आहे.

Protected Content