Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाविकास आघाडीचा आज भव्य मोर्चा : सरकार विरोधात शक्ती प्रदर्शन करणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांचा आज मुंबई येथे भव्य महामोर्चा आयोजीत करण्यात आला असून यात प्रामुख्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य करत त्यांना हटविण्याची मागणी करण्यात येणार आहे.

आज महाविकास आघाडीचा महामोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिल पासून सकाळी १०.३० वाजता मोर्च्याला सुरूवात होईल. यानंतर आझाद मैदानावर याचे सभेत रूपांतर होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत विदग्रस्त वक्तव्य केल्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. या माध्यमातून त्यांना हटविण्याची मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड या भाजप नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला असल्याचा आरोप होत असून त्यांचा निषेध देखील होणार आहे.

Exit mobile version