Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र हादरला ! मदरशाचा नावाखाली चिमुरड्यांची तस्करी, ५९ मुलांची सुटका

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राला हादरवानरी एक बातमी समोर आली आहे.  रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांनी मुलांच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट उघड केले आहे.

 

मुलांची तस्करी उघड होऊ नये म्हणून त्यांना मदरसाचा ड्रेस परिधान करुन त्यांची तस्करी केली जात होती. या लहान मुलांना पुणे किंवा सांगलीतील मदरशात नेण्याचा प्लॅन असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाची कसून चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. या ५९ मुलांची पोलिसांनी सुटका केली आहे. मुलांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. या प्रकारामुळे तस्करीचे मोठे रॅकेट उघड होणार आहे.

 

बिहारमधून महाराष्ट्रात आणण्यात आलेली सुमारे ५९ मुलांची रेल्वेपोलिसांनी सुटका केली आहे. जळगाव आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली आहे. दानापूर – पुणे एक्स्प्रेसमध्ये ही मुले आढळून आली. पोलिसांना या मुलांच्या तस्करीचा संशय आहे.

 

या ३० मुलांची सुटका करत ४ तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. पूर्णिया जिल्ह्य़ातून सांगली येथे या मुलांची तस्करी होत असल्याचे चौकशीत या आरोपींनी सांगितले आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलांना मदरशाचा ड्रेस घालण्यात आला होता. २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत सीडब्ल्यूसी जळगावला पाठवण्यात आले. तर मनमाड येथे सुटका झालेल्या ३० बालकांना चाइल्ड हेल्प डेस्क एनजीओ नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version