महाराष्ट्र सरकारने सुशांत प्रकरणात एसआयटी गठीत करावी

 

मुंबई, वृत्तसंस्था । सुशांत सिंह प्रकरणात एम्सचा विशेष अहवाल आल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील महाराष्ट्राच्या बदनामीचे भाजपाचे कारस्थान उघड झाल्याचा दावा केला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील महाराष्ट्राच्या बदनामीचे भाजपाचे कारस्थान उघड झाले आहे , असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. सुशांत सिंह प्रकरणात एम्सचा विशेष अहवाल आल्यानंतर सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सुशांत सिंहची हत्या झाली नाही तर त्याने आत्महत्याच केली असल्याचा अहवाल दिला आहे. या अहवालानंतर सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली. “महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या तसेच या कारस्थानाचे मास्टरमाईंड शोधण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने एसआयटी गठीत केली पाहिजे”, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

“सुशांतसिंह राजपूत केसमध्ये तपासणी करणाऱ्या एम्सच्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने आपला रिपोर्ट सीबीआयकडे सुपूर्त केला आहे. या फॉरेन्सिक टीमने आपल्या अखेरच्या रिपोर्टमध्ये सुशांतचा मृत्यू आत्महत्येनेच झाल्याचं म्हटलं आहे. एम्सच्या एक्सपर्ट पॅनेलने सुशांतचा गळा दाबून हत्या करण्याच्या संभावलेला धुडकावून लावलं आहे”, असंही सचिन सावंत यांनी सांगितले.

Protected Content