Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र राज्य सहसंघटकपदी सुर्यवंशी

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । येथील महेंद्र सूर्यवंशी यांची नुकतीच जन हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य सह संघटकपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्या निवडीने सर्वत्र कौतुक होत असून पिडीत व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी मी नेहमी तत्पर राहणार असल्याची   ग्वाही सूर्यवंशी यांनी दिली. 

जन हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष राजपाल बडगे यांनी महेंद्र सूर्यवंशी  यांना नियुक्ती पत्र देताना निष्ठा ,कर्तव्य व भावनेने समाजातील विविध समस्या, गोर गरिबांचे कल्याण व भ्रष्ट्राचार निर्मूलना सारख्या पवित्र कामास हातभार लावावा असे सांगितले. तसेच यावेळी बोलतांना सूर्यवंशी यांनी मी जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर राहणार आहे. समितीने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासास मी कधीही तडा जाऊ देणार नाही. या समितीचे कार्य गावागावात पोहोचवण्यासाठी मी नेहमी परिश्रम घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. समितीने दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून निष्पाप भावनेने कार्य करेल असे  महेंद्र सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. 

Exit mobile version