Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका कार्यकारणी  रोटरी क्लब हॉल अमळनेर  येथे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले सर यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले सर,जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत काटे,अमळनेर तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे,कार्याध्यक्ष समाधान मैराळे यांच्या उपस्थितीत तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली.  यावेळी उपाध्यक्षपदी धनंजय सोनार व प्रा हिरालाल पाटील,सचिवपदी सुरेश कांबळे तर सहसचिवपदी ईश्वर महाजन कोषाध्यक्ष पदी राहुल पाटील, प्रसिद्धी प्रमुख दिनेश पालवे व हितेंद्र बडगुजर, संघटक प्रवीण बैसाणे तर सहसंघटक नूर खान तर कार्यकारणी सदस्य चंद्रकांत काटे, गौतम बिऱ्हाडे, विजय गाढे, सुखदेव ठाकूर, उमेश धनराळे, उमेश काटे, मिलिंद पाटील, जयेश काटे, विनोद कदम, काशिनाथ चौधरी, दिनेश नाईक, रवींद्र मोरे, जितेंद्र पाटील, भरत पवार, गुरूमल बठेजा ,सत्तार खान, आत्माराम अहिरे, अजय भामरे, विवेक अहिरराव, योगेश पाने, गणेश चव्हाण, प्रसाद जोशी, अरुण पवार, अनिल पाटील, बापूराव पाटील, कमलेश वानखेडे यांची निवड करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्याध्यक्ष समाधान मैराळे यांनी केले. तर नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे यांनी केली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष डिगंबर महाले सर व जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत काटे यांनी नूतन पदाधिकारी यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य रवींद्र मोरे यांचे चिरंजीव सूरज रवींद्र मोरे यांनी एमबीबीएसच्या नीट परीक्षेत ७२० पैकी ५८७ मार्क आणि ऑल इंडिया कोठ्या मधून मुंबईचे नायर वैद्यकीय महाविद्यालय मध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षात मोफत प्रवेश मिळाला म्हणून  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना व व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांनी अमळनेर तालुक्यात उत्कृष्ट कार्य करू तसेच पत्रकारांच्या परिवारातील सदस्यांच्याही आरोग्य शिबिराचे आयोजन करून हा संघ पत्रकारांच्या सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही या बैठकीत देण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार संघाचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version