Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आयटकचे निदर्शने

जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य खात्यामध्ये कंत्राटी नर्सेस यांना आरोग्य विभागात कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आयटकच्या वतीने बुधवारी १७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आयटक या राज्यस्तरीय युनियन मार्फत कंत्राटी पद्धतीने शासन सेवेत नर्सेस काम करत आहे. कंत्राटी पद्धतीने काम करत असताना नर्सेस यांनी कोरोना काळात देखील अतिशय तटपुंज्या मानधनावर काम केले आहे. याचा मोबदला अद्यापपर्यंत शासनाकडून कुठलाही देण्यात आलेला नाही. यामध्ये वाढीव भत्ता, पदोन्नती तसेच कंत्राटी पद्धतीवरून शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागण्या अद्यापपर्यंत प्रलंबित आहे. या मागण्या तातडीने पूर्ण कराव्या या मागणीसाठी बुधवारी १७ मे रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आयटकच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी कंत्राटी नर्सेस युनियनचे अध्यक्ष पूनम चौधरी, मंगला दायमा, योगिता शिंदे, भावना भिरूड, अनिता भदाणे, दिपाली भिसे, साधना चव्हाण, जयश्री कणखरे, नीला कोळी, सुनीता देवरे, भारती पाटील, सरला कठरे, सुरेखा मेटे, अलका सोनवणे यांच्यासह कंत्राटी नर्सेस युनियनच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version