महाराष्ट्र भाजपची कार्यकारणी जाहीर ; एकनाथराव खडसे, विनोद तावडे फक्त निमंत्रित सदस्य

 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र भाजपची कार्यकारणी जाहीर आज करण्यात आली आहे. या कार्यकारणीत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहे. दरम्यान, कार्यकारणीतून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि  विनोद तावडे यांना मात्र, फक्त निमंत्रित सदस्य ठेवण्यात आले आहे. तर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आलीय. पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

 

पंकजा मुंडे यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र भाजपची कार्यकारणी जाहीर करताना दिली माहिती आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, या प्रमुख कार्यकारणीत माझ्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. याशिवाय 7 प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करतो. या व्यतिरिक्त 18 प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत आहोत. दरम्यान, पंकजाताईंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या शंभर टक्के असतील, केंद्राची जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी, पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यांना जबाबदारी दिली असे नाही, असेही स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. विधानसभेत मुख्य प्रतोद हे आशिष शेलार, माधुरी मिसाळ असतील असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

भाजपची कार्यकारिणी 

महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

उपाध्यक्ष –माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष असतील

सेक्रेटरी –

माजी आमदार प्रमोद जठार, , संजय पुराम, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, अर्चना तेहटकर

Protected Content